About us

नितीन बानुगडे पाटील

Jump to navigationJump to search

नितीन बानुगडे पाटील हे महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित. जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.

नितीन बानुगडे पाटील


नावप्रा. नितीन संपतराव बानुगडे पाटील
शिक्षणM.Sc. (Physics) Pune University

B.Ed (Yashwantrao Chavan Open University)

B.J. (Bachelor of Journalisim)

जन्म२५-०५-१९७७
निवासस्थानरहिमतपूर
नागरिकत्वभारतीय
पेशाप्राध्यापक, इतिहास अभ्यासक, लेखक,प्रेरणादायी वक्ते
प्रसिद्ध कामेआपल्या तेजस्वी वानीतुन महारष्ट्राच्या काना कोपऱ्यापर्यंत छ.शिवाजी महाराज, छ.संभाजी महाराज,यशवंतराव चव्हाण,जगणं समाजासाठी अशा अनेक विषयांवर प्रबोधन व तरुण पिढीला मार्गदर्शन,गडकिल्ल्यांच्या संर्वधनासाठी नेहमी पुढाकार .
मूळ गावसातारा
ख्यातीसुप्रसिद्ध वक्ते,लेखक,
राजकीय पक्षशिवसेना
धर्महिंदू धर्म
पुरस्कारजगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार


गर्दीचे नवनवीन उच्चांक मांडीत महाराष्ट्रात होणारी त्यांची व्याख्यानेच त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देतात. इतिहासाचा शोध घेत भविष्याचा वेध घेणारी त्यांची ही वर्तमानातील व्याख्याने प्रबोधनाचा नवा जागर घडवणारी ठरली. २०१४ मध्ये शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश.

सामाजिक कार्य

 • महाराष्ट्रातील गड -दुर्ग संवर्धनासाठी कार्य .
 • गडकिल्यांचे मोल आणि महत्व सांगण्यासाठी प्रबोधन.
 • महाराष्ट्रातील पहिल्या दुर्ग साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन.
 • वर्धनगड जि . सातारा येथील दुर्ग साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष.
 • महाराष्ट्राच्या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी कार्यरत.
 1. "प्रतापसृष्टी " सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे जन्मगाव भोसरे जि. सातारा
 2. स्वराज्याचे प्रवेशद्वार वर्धनगड किल्ला (वर्धनगड गाव विकासासाठी दत्तक )
 3. सरसेनापती हंबिरराव मोहिते यांचे जन्मगाव तळबीड या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी योगदान
 • स्वातंत्र्यलढ्यातील वीरांच्या स्मृती जपणाऱ्या हुतात्म्या स्मारकांच्या जातन व संवर्धनासाठी भरीव कार्य
 • गडकिल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या अनेक संस्थात्मक कार्यात सहभाग.
 • सह्याद्री प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमाने अनेक सामाजिक उपक्रम.
 • युवकांसाठी स्पर्धापरीक्षा , करिअर मार्गदर्शन
 • ग्रामीण भागातील युवकांसाठी 'स्वयंउद्योगातून स्वयंपूर्तता ' कार्यशाळेचे आयोजन.
 • समाजातील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींचा आदर्श लोकांसमोर यावा यासाठी त्यांच्या प्रकट मुलाखती
 • शेतकऱ्यांच्या आत्महत्या , विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या यासारख्या गंभीर विषयांवर कार्य करत सर्वसामान्य शेतकऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रेरणादायी उपक्रम.
 • वृक्ष लागवड,पर्यावरण रक्षण यासाठी विविध उपक्रमांचे नियोजन.

राजकीय 

 • सन २०१४ मध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश
 • शिवसेना उपनेतेपदी निवड
 • सातारा - सांगली जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड
 • महाराष्ट्र खोरे विकास महामंडळ उपाध्यक्षपदी निवड (राज्यमंत्री दर्जा )

बानुगडे पाटील यांनी लिहिलेली पुस्तके

 • राजकार्य धुरंधर शंभू छत्रपती (छ. संभाजी महाराज जीवनचरित्र )
 • काही जनातले काही मनातले (समाजातील नानाविध प्रश्नांवर वैचारिक मंथन )
 • रौद्र (संभाजीमहाराजांच्या जीवनावरील कादंबरी)
 • शंभूराजे (महानाट्य)
 • काही जनातल काही मनातलं
 • यशाचा पासवर्ड (प्रेरणादायी )
 • वंदे मातरम (महानाट्य - १८५७ ते १९४७ या स्वातंत्र्य समराचा इतिहास उलगडणाऱ्या महानाट्याचे लेखन )

स्तंभलेखन व सदरलेखन 

 • अशी गावे असा इतिहास - (दैनिक ऐक्य ) सन २००१
 • शिवप्रताप -(दैनिक पुढारी ) सन २००३ ते २००८
 • यशाचा पासवर्ड - (साप्ताहिक चित्रलेखा ) सन २०१३ ते आजअखेर
 • विचारमुद्रा - (दैनिक सकाळ ) सन २०१९ ते आजअखेर
 • साहित्य संमेलनाच्या वाटेवर - (दैनिक पुढारी )
 • पैलू शिवरायांचे , "स्वराज्यपर्व " (महाराज शिवाजीराजे भोसले )
 • "रौद्र " (छ . संभाजीमहाराज यांचे जीवनचरित्रावर संशोधनात्मक लेखन )
 • गेली २० वर्षे मासिके, नियतकालिके, साप्ताहिके, वृत्तपत्रे यातून विविध विषयांवर वैचारिक तसेच संशोधनावर विपुल लेखन प्रसिद्ध.