कथाकथन - अनमोल वस्तू Valuable Thing | Nitin Banugade Patil

नैतिक कथा -अनमोल वस्तू


एकदा राजा कृष्णदेवरायाने राज्यातील शिल्पकारांना आव्हान दिले, की एक सुंदर शिल्प उभे करावे. हे आव्हान एका तरुण शिल्पकाराने स्वीकारले. त्याने सहा महिन्यांच्या आत एक सुंदर शिल्पकृती साकारली. राजा शिल्प पाहून खूपच खूश झाला. 

राजाने त्याला दरबारात बोलावून सन्मान केला व मानधनापेक्षा अधिक रक्कम दिली व म्हणाला, हे शिल्पकारा आम्ही तुझ्या कामावर बेहद्द खुश आहोत. तुला या धनापेक्षा अधिक काही मागायचे असेल तर मागून घे. शिल्पकाराने यावर नकार दिला; पण राजाने त्याला काहीतरी मागण्याची विनंती केली. शेवटी राजहट्टापुढे माघार घेत शिल्पकाराने कमरेची एक पिशवी काढून राजापुढे धरली व म्हणाला, महाराज, तुमची जर इच्छाच असेल या पिशवीत तुम्ही मला जगातील सर्वात अनमोल वस्तू आणून द्यावी.

कथाकथन - अनमोल वस्तू | Nitin Banugade Patil

राजा गोंधळात पडला, की अशी कोणती वस्तू आहे, की जी मा अनमोल आहे. राजाने दरबारातील मंडळींना विचारले तर कुणी नम्हणाले सोने द्या, नाणे द्या, हिरे-मोती, दागिने पण शिल्पकाराला …या गोष्टीत काहीच रस नव्हता. 

शेवटी तेनालीराम उठला व त्याने शिल्पकाराच्या हातातील पिशवी काढून घेतली. तेनालीरामाने ती पिशवी चारपाचवेळा डोक्यावरून गरागरा फिरवली व तिचे तोंड बंद केले शिल्पकाराच्या हातात ठेऊन म्हणाला, ही घ्या तुमची व अनमोल वस्तू. राजासकट सर्व दरबारी लोक त्याला हसू लागले. तेनालीराम सर्वांकडे पाहून म्हणाला, यात हसण्यासारखे काय आहे? हवा हीच सर्वात अनमोल वस्तू आहे. ती जर नसेल तर जगात कोणीच जिवंत राहू शकणार नाही. असे उत्तर ऐकताच सर्व दरबारी मंडळींनी टाळ्यांचा कडकडाट केला. राजाने शिल्पकाराला व तेनालीरामला अधिक इनाम दिले.


प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने