नैतिक कथा - प्राणिमात्रांचा स्वभाव | Nitin Banugade Patil

नैतिक कथा - प्राणिमात्रांचा स्वभाव

tiger and fox story

एक सिंह आणि लांडगा असे दोघे वनातून फिरत असताना त्यांच्या कानी काही मेंढ्यांचा आवाज आला. तो आवाज ऐकून मोठ्या बढाईने लांडगा सिंहाला म्हणाला, महाराज, तुम्ही आता चालून चालून दमला असाल, तेव्हा तुम्ही इथेच बसा. मी तुमच्यासाठी दोनचार मेंढ्या मारून आणतो.

याप्रमाणे बोलून लांडगा उ मेंढ्यांच्या आवाजाच्या रोखाने गेला असता त्याला त्या मेंढ्यांच्या कळपाजवळ मेंढ्यांचा धष्टपुष्ट मालक आणि चार शिकारी कुत्रे असल्याचे दिसले.

त्याबरोबर तो लांडगा परतपावली सिंहाकडे आला व सिंहाला म्हणाला, महाराज तुम्ही तर या जंगलाचे राजे आहात आणि तिकडे उभ्या असलेल्या मेंढ्या रोगट आणि अशक्त आहेत. इतक्या साया मेंढ्यामध्ये एकही मेंढी चांगली नाही तेव्हा आपण दुसरी कोणती तरी शिकार करणेच बरे होईल.

सिंहानेही शिकारी कुत्र्यांचा आवाज ऐकला होता. त्यामुळे सिंहाला लांडग्याचा धूर्तपणा लक्षात आला.

तात्पर्य -

आपली असाहाय्यता लपविण्यासाठी काही ना काही सबबी पुढे करणे हा प्राणिमात्रांचा स्वभाव आहे.


प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने