नैतिक कथा - अंडे व विट यांच्यातील साम्य
'कोंबडीचे अंडे आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी विट यांच्यात एका बाबतीत साम्य आहे ते कोणत्या बाबतीत आहे? जरा ओळखून दाखव. मैत्रीणीने माझ्यापुढे कोडे टाकले. मला विचार चक्रात अडकवून स्वत: पसार झाली. मी विचार करु लागले, बांधकामाची विट आणि कोंबडीची अंडे यात काय साम्य असणार?
खूप विचार करुनही उत्तर न सापडल्यामुळे शेवटी शेजारी सुरू असणाऱ्या बांधकामावरून दोन विटा आणि बाजारातून घेवून घरी आले. खूप निरीक्षण केले पण उत्तर सापडले नाही अर्धा डझन अंडी दुसऱ्या दिवशी तीच मैत्रीण पुन्हा माझ्याकडे आली, काय सापडले काय उत्तर ?
मी नकारार्थी मान हलविली आणि आता तूच साम्य काय ते साम्य दाखवं - ! असे म्हणून 'ती अंडी आणि विटा तिच्यापुढे ठेवल्या. मैत्रीणीने हातात अंडे घेतले. ते उभे ठेवले आणि दाबले. पण ते फुटले नाही.
अंड्याला आडवे केले आणि दाबले. ते चट्कन् फुटले. मग तिने दोन फुटावरुन हातात उभी धरलेली विट खाली सोडली. विटीला काहीच झाले नाही. मग तेवढ्याच अंतरावरुन तिने आडवी धरून विट खाली सोडली. आता मात्र विट फुटली. विट आणि अंडे उभे असेपर्यंत नाही. आडवे होताच फुटते .
हे त्या दोघांमधील साम्य माझी ती मैत्रीण मला सांगत होती. मला असले उत्तर अपेक्षीत नव्हते आणि त्याचा मैत्रिणीला जरा रागच आला होता. खरोखर विचार करु जाता उभे अंडे किंवा विंट आडवी होताच फुटली होती. डोक्यात विचारचक्र सुरू झाले.
माणूस त्या विट किंवा अंड्यासारखा. तो जोपर्यंत खंबीरपणे उभा आहे. सजग आहे, तोपर्यंत कोणीच त्याचे भवितव्य बिघडवू शकत नाही. पण जर का तो सुस्तावला, जरा आडवा झाला की, त्याचे भवितव्य फुटण्याची शक्यता बळावते.
तात्पर्य - सदैव खंबीरपणे उभे राहा. जग तुमचे काही बिघडवू शकत नाही अंडी आणि विट कदाचित हाच संदेश देत असावेत.