Nitin Banugade Patil जगातील सर्वात लहान वयातील महानाट्यकार - Article by प्रथमेश इंदुलकर (इचलकरंजी)

नितीन बानुगडे पाटील

आपल्या वाणी बद्दल लिहावं तितकंच अपुरे आहे. बोललं तितकंच कमी आहे. तुमच्या मुखातून सुटलेलं शब्द स्वराज्याच्या इतिहासाची ओळख करून देतात, तर कधी तेच शब्द भरकटलेल्या तरुणांना आपले ध्येय गवसण्याची प्रेरणा देतात..! म्हणूनच जगातील सर्वात लहान वयातील महानाट्यकार प्रबोधनकार उत्कृष्ट बक्ता, दिशा देणारे लेखक अश्या कैक पदाव्यांनी तुमचा गौरव केलेला अवघा महाराष्ट्र पाहतोय. 

Nitin banugade patil biography


एम. एस. सी, भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ), बी. एड ( सातारा), बी.जे (कराड) असे शिक्षण बानुगडे पाटील यांनी घेतलं आहे. पण हा तुमचा प्रवास जाणून घेत असताना हे यश मिळवण्यासाठी तुम्ही केलेला संघर्ष ही आम्ही जाणून घेतला पाहीजे, सातारा जिल्हातील रहिमतपूर गावात १० मे १९७७ ला नितीन बानुगडे पाटील यांचा जन्म झाला. इयत्ता ४ थी मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या विषयाने पहिल्यांदा वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावर उभे राहीले आणि बाजी मारली. व संपूर्ण महाराष्ट्रभर वक्तृत्व स्पर्धेचा प्रवास चालू झाला त्यांचा दंडकच होता एकाच स्पर्धेत प्रथम क्रमांक आला की पुढच्या वेळेस त्या स्पर्धेत सहभागी व्हायचं नाही.. तब्बल १२७ वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी आपल्या वक्तृत्वाचा पाया रोवला. त्याच सोबत शंभूराजे, वंदे मातरम् अश्या महानाट्य लेखन करून ते महानाट्याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर सादर झाले. या महानाट्याच्या लेखनातील सखोलता आणि अभ्यास पाहून लोक आकर्षले जावु लागले.

सरांना व्याख्यान रूपी मार्गदर्शन करण्यासाठी लोक निमंत्रित करू लागले. वयाच्या २५ ते २६ वर्षेपासून लेखनाचा प्रवास एका वक्तया कडे वळू लागला. स्वतः नवी शैली, अभ्यातील परिपकता लोकांना सखोल रुजु लागली. आणि वर्षाकाठी तीन ते साडेतीन लाख किलोमीटर प्रवास व्याख्यांसाठी होऊ लागला. आज पर्यंत ५००० पेक्षा अधिक व्याख्याने संपन्न झाली. इथेपर्यंत पोहचण्यासाठी घरचे वातावरण ही अनुकूल होते. इयत्ता ७ वी मध्ये रहिमतपूर गावातील हिंद बाचनालयात प्रवेश घेतलेल्या सरांनी १० होईपर्यंत बाचालयातील संपूर्ण पुस्तके वाचून पूर्ण केली होती. बडील सरांनी लहान असताना रहिमतपूर गावात होणारे किर्तन ऐकायला घेऊन जायचे. यातूनच आपल्या संस्कृतीची इतिहासाची आवड लागली होती. 

आपल्या शिक्षणाचा अभ्यास करत असताना कंटाळा आला की विविध विषयांवर आधारित असणारे पुस्तक वाचनास घेऊन बसायचे. आज ही सरांचा रोज एक पुस्तक वाचल्याशिवाय दिवस पूर्ण होत होत नाही. तरुणांना मार्गदर्शक करताना ते नेहमी सांगतात वाचलं पाहीजे पुस्तकाने मस्तक सुधारत आणि जे मस्तक सुधारलेल असत ते मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही. आज महाराष्ट्रातील युवा पिढी घडवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. तरुण त्यांच्या व्याखानाने प्रवृत्त होऊन नव निर्मिती करत आहेत. आज नितीन बानुगडे पाटील सरांचा जन्म दिवस सरांना जन्म दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. सरांच्या बद्दल लिहा तितके शब्द कमीच आहेत फक्त इतकेच सांगेन अनेकांचे भविष्य उजळले तुमच्या असामान्य वाणीनेदंडवत त्या विचारांना मला घडविले आज जन्म दिनाच्या निमित्ताने माझ्या विचारांचे पुष्प गुरुचरणी अर्पण करतो. तुम्हास उदंड निरामय आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..


- प्रथमेश इंदुलकर (इचलकरंजी)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने