यशाचा पासवर्ड (भाग :35) - प्रेम (Love)
प्रेमाने भारलेल्या लोकांना जगातील कोणत्याही बंदुका पराभूत करु शकत नाहीत..!
प्रेमाचा संबंध आयुष्याशी आहे. प्रेम तुम्हाला विशाल आणि व्यापक बनवतं. आतून मोठं करण्याची, जीवनात आमूलाग्र बदल करण्याची तसेच प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवण्याची ताकद फक्त प्रेमातच असते. प्रेम तुम्हाला कधीही कुठेही अपयशी होऊ देत नाही. अपयशाच्या आजाराला तिरस्कार, द्वेष कारणीभूत असतात. तिरस्कार आयुष्य संकुचित करतो; प्रेम आयुष्य अमर्यात बनवतं. तिरस्कार माणसं तोडत वाद निर्माण करतो; प्रेम माणसं जोडत सुसंवाद प्रस्थापित करतं. तिरस्कार जग लांब नेतो तर प्रेम जग जवळ आणतं.
उद्ध्वस्त जगाच्या माथ्यावर यशाचा झेंडा रोवून उपयोग काय? यशाची झळाळी असते ती शांतता नि समृद्धतेत! असं दीर्घकाळ टिकणारं यश हवं असेल, तर हृदयात प्रेम हवं. प्रेम चैतन्य, उत्साह, आनंद बहाल करतं. आपल्या मित्रांवर तर तुटून प्रेम कराच; पण शत्रूंवरही करा. इतकं की, प्रतिसाद म्हणून त्यालाही प्रेमच करावं लागेल. शस्त्रसज्ज नि बलाढ्य ब्रिटिशांच्या विरोधातली स्वातंत्र्याची लढाई महात्मा गांधींनी जिंकली ती अहिंसा-प्रेमाच्या शस्त्रावर! हेच शस्त्र पुढे मार्टिन ल्यूथर किंग यांनी उपयोगात आणलं. आगीशी आगीने नव्हे; प्रेमाने लढायचं असतं. प्रेमाच्या अतुलनीय शक्तीने भारीत झालेल्या लोकांना जगातील कोणत्याही बंदुका-तोफा-बॉम्बही पराभूत करू शकत नाही, असं सांगून मार्टिन यांनी अमेरिकेत ते सिद्धही करून दाखवलं.
एखाद्या गोष्टीसाठी काहीही करायला सिद्ध व्हायचं असेल, तर तुमचं त्यावर निस्सीम प्रेम हवं. मग ते तुमचं कार्यक्षेत्र असू द्या. कला असू द्या. तुमचं ध्येय असू द्या वा तुमची भूमी! मातृभूमीवर विलक्षण प्रेम करणारा इवलासा बाबू गेनू इंग्रजांच्या बळापुढे नमला नाही. विदेशी कपड्यांची होळी करत हातातला तिरंगा उंच फडकावत अंगावर ट्रक घालण्याच्या इंग्रजांच्या धमकीला बधला नाही. त्यात मातृभूमीबद्दलचं प्रेम उंचवळत राहिलं आणि बेसुमार मृत्यूलाही सामोरे जाण्याचं त्याचं विलक्षण सामर्थ्य इंग्रजांनाही अमाप संपत्ती आणि अफाट प्रसिद्धी मिळालेली असूनसुद्धाच्या सत्तरीतही अमिताभ बच्चन काम करतात, याचं कारण त्यांचे कलेवर प्रेम आहे आणि त्यांच्या कलेवर रसिकांचं प्रेम आहे. आपल्यावर प्रेम करणारे आहेत. हे कळल्यावर माणूस अधिक आणि चांगलं काम करतो. तर कुणी प्रेम नसल्याची साधी शंकाही आपल्या कार्यशक्तीला खाली आणते. प्रेम क्रियाशीलता वाढवते; तर प्रेमहीनता निष्क्रिय बनवत जाते.
प्रेमाचा अभाव मानसिक आजारांना आमंत्रण देतो. संशोधन सांगत, co टक्के शारीरिक आजार हे प्रेमाच्या अभावानेच होतात. प्रेम सान्यांची गरज आहे. इतरांच्याच नव्हे आपल्या आनंदासाठी सान्यांवर प्रेम करा! घेणारांच्या या जगात देणारे व्हा!
संत कबीर थंडीच्या दिवसांत मध्यरात्री रस्त्याने चालले होते. इतक्यात एक भिकारी कडाक्याच्या थंडीने भयाण कुडकुडताना त्यांना दिसला. त्यांनी क्षणात स्वतःच्या खांद्यावरची शाल काढली. अर्धी फाडली अन् ती अर्धी शाल त्या भिकान्याच्या अंगावर पांघरली. त्या भिकाऱ्याची थंडी कमी झाली. कबीर समाधानाने पुढे निघाले. काही वेळाने थंडी आणखीनच वाढली. आता ती कवीरांनाच सहन होईना. ते थंडीने थडथडू लागले आणि अचानक एका पायरीवर बसून कबीर रडू लागले. कबीरांना रडताना बघून त्यांच्या पाठीमागून येणारा एक गृहस्थ त्यांना म्हणाला, या अर्ध्या शालीतून तुमची थंडी निघत नाही. ना. आता पश्चाताप होत असेल, त्या भिकाऱ्याला अर्धी शाल दिल्याबद्दल. नसती दिली तर अख्ख्या शालीतून तुमची थंडी निघाली असती ना.. आता तसे संत कबीर त्याला म्हणाले, मित्रा मी त्या भिकाऱ्याला अर्धी शाल दिली म्हणून रडत नाही. या अर्ध्या शालीतून माझी थंडी निघत नाही. मग त्या भिकान्याचीही निघत नसेल. अरे, मी मघाशीच त्याला अख्खी शाल का दिली नाही? या विचाराने मी रडतोय.
प्रेम इतरांसाठी जगायला शिकवतं आणि जे लोक इतरांसाठी जगतात तेच तर मोठे होतात!