जग जिंकायचं तर आधी स्वतःला जिंकाव लागतं | Yashacha Password (Part 34) - प्रेम (Love)

यशाचा पासवर्ड (भाग :34) - प्रेम (Love)

स्वत:वर प्रेम करणारी माणसंच जगावर नि जगण्यावर प्रेम कर शकतात...!

स्वतःला कमी लेखण्याच्या न्यूनगंडातून माणसे समाजातून बाजूला होतात. ती एकाकी, एकलकोंडी बनतात. एकटैपणात त्यांथ्याभावती नकारात्मक विचारांचं जाळे गडद होतं. अशी माणसं निराशेच्या गर्नेत अडकतात. जीवनातून अकाली निवृत्त होतात. जगण्यात अपवरशी टरतान.

याउलट, जीवनात अत्यंत यशस्वी ठरलेल्या, जिथे जाईल तिथे आनंद पेरत राहाणाऱ्या, प्रत्येकाच्या मनात चैतन्य निर्माण करणाऱ्या, जगण्याचा भरभरून आस्वाद घेणाऱ्या एका मनस्वी माणसाला त्याच्या या आनंदाचं यशाचं रहस्य विचारलं, तेव्हा तो उदगारला, मी स्वत:वर प्रचंड प्रेम करतो!

यशस्वी व्हायचं तर स्वतःला कमी लेखण्याची न्यूनगंडाची भावना टूर सारून स्वत:वर प्रेम करायला शिकणे आपण जसे आहोत तसे सर्वो्म आहोत, हे मानायला शिका. दोन पानं एकसारखी नसतात. दोन माणसं एकसारखी नसतात. दोन बोटांचे ठसेही एकसारखे नसतात. प्रत्येकजण वेगळा आहे म्हणूनच त्यांचं वेगळेपण आहे. तुम्हीही असेच वेगळे आहात. या सृष्टीत तुमच्यासारखे फक्त तुम्हीच! स्वत:च्या एकमेवाद्वितीयत्याबद्दल अभिमान बाळगायला शिका. या सूष्टीत कधीच काही निख्पयोगी किंवा वाईट जन्माला येत नाही.

Successful man | Yashacha Password (Part 34) -  प्रेम (Love)

तुम्ही वारंवार एखाद्याच्या सहवासात आलात, तर प्रेम बाडीस लागतं. बस्स. तुम्हीही स्वतःच्या सहवासात राहा. स्वतःला ऐकत-बघत राहा. स्वत:शी संवाद साधत राहा. समोरच्याला आपण आवडावं यासाठी जसं त्याला जेजे आवडतं तेते आपण करत राहातो, तसं स्वतःसाठी करत राहा! तुम्ही स्वत:ला आवडू लागाल, स्वत:वर प्रेम करू लागाल. ह्यावेळी तुम्हाला एकटेपणा खायला उठणार नाही. उलट, तो एकटेपणा स्वत:वर प्रेम करण्याचा, स्वतःला समृद्ध करण्याचा अनमोल ठेवा होऊन जाईल, प्रेम सकारात्मकता बहाल करते, तर नकारात्मकता प्रेमापासून दर नेते, ज्यांचा स्वतःशी नकारात्मक संवाद चालू असतो, त्यांचा बाह्य जगाशी चालणारा। संवादही नकारात्मकच असतो. ज्याच्यावर प्रेम असतं, त्याच्याशी आपण गोड, प्रेमळ उत्साह देणारं बोलत राहातो. 

भविष्याची सकारात्मक स्वप्न फुलवत राहातो. तसंच स्वतःशी गोड सकारात्मक बोलत राहा. मग कितीही नकारात्मक असलं, तरी तुम्ही त्यावर मात करालं. जी माणसं स्या वर प्रेम करतात, तीच माणसं इतरांवर प्रेम करू शकतात. त्यांच्याच मनात माणुसकीचा गहिवर जन्मतो. ती साच्यांच्या कल्याणासाठी झेपावतात. स्वतः वर प्रेम करणारी माणसंच सर्जनशील असतात. ती सातत्याने कृतिशील कार्यशील राहातात. या साऱ्यातूनच रचनात्मक सर्जनशीलता विकसित होते.

प्रेम हे धाडस करायला, संकटाशी झुंजायला शिकवतं. सर्वोत्तम-सर्वों च्च स्थानी पोहोचलेल्या यशस्वी माणसांत एक समान धागा दिसतो. ही माणसं स्वत:वर विलक्षण प्रेम करत होती. स्वत:वरचं प्रेम वाढवण्यासाठी, स्वतःबद्दलची गौरवाची भावना आणखी वाढवण्यासाठी अधिक कार्य करत धडपडत होती. त्यांनी स्वतःची इतरांशी कधी तुलना केली नाही. तुलना न्यूनगंडाला जन्म देते. त्यांनी स्वत:बरोबरच स्पर्धा केली. स्वतःशी केलेली स्पर्धा स्वत:ला समृद्ध करत जाते. कोणतंही यश मिळवण्यासाठी स्वत:शी स्वतःची बांधिलकी असावी लागते. ही बांधिलकी प्रेमातूनच जन्म घेते.

तुम्ही स्वतःवर प्रेम करत नसाल, तर स्वतःला क्षुद्र लेखाल. स्वतःची किंमत स्वत:च्या नजरेत कमी करून घ्याल, तर इतर लोक तुम्हाला कसे किंमत देतील? यशस्वी व्हायचं तर स्वतः वर प्रेम करायला, स्वतःशी बांधिलकी जपायला, स्वत:बद्दल गुणग्राहकता दाखवायला, स्वतःबहन चांगली भावना ठेवायला, स्वतःची सकारात्मक स्वप्रतिमा विकसित करायला शिका. यशासाठी ती महत्त्वाची! कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंदवन फुलवणारे बाबा आमटे, अनाथांच्या उशाला आनंदाचा दीप लावणाऱ्या मदर तेरेसा यांनी या लोकांना सर्वोत्तम होण्याचा एकच मंत्र दिला-स्वतः वर प्रेम करायला शिका! लक्षात ठेवा, जग जिंकायचं तर आधी स्वतःला जिंकाव लागतं आणि जिंकणं प्रेमानंच साधलं जातं ! 


नितीन बानुगडे पाटील (इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने