बलाढ्य आत्मविश्वास असणारी माणसंच यशस्वी होतात | Maharana Pratap Information in Marathi

यशाचा पासवर्ड - भाग 10

आत्मविश्वास - Confidence

प्रबळ आत्मविश्वासाच्या बळावरच यश मिळवता येते...!

Cover Topics In This Article :

1) महाराणा प्रताप यांनी पंधरा हजार सैन्यासह एक लाखाच्या फौजेचा सामना कसा केला ?

2)आत्मविश्वासाच्या अभावी माणसं कळपातल्या मेंढरासारखी जगत राहतात.

3)काही माणसं काहीच करत नाही. मात्र नुसती स्वतःच्या बढाया मारत राहतात.

4) धाडसी दर्यावर्दी कोलंबस 

5)  आंतरराष्ट्रीय कीर्तीचा जगदविख्यात संगीतकार ए.आर. रेहमान

          संकटं मोठी किंवा छोटी कधीच नसतात. त्यांना सामोरं जाण्याचा आपला आत्मविश्वास कसा आहे, यावरच ती अवलंबून असतात. महाराणा प्रतापकडे Maharana Pratap त्यांचा सरदार भामाशाह धावत-धावत येऊन सांगू लागला, 'ठाकूरजी,गहजब झाला. तब्बल एक लाखाचं मोगल सैन्य प्रत्यक्ष जहांगीरच्या नेतृत्वाखाली आपल्यावर चालून येतंय...!' 

     'बरं मग ? राणा प्रताप Maharana Pratap म्हणाले. 

    'ठाकूरजी. अहो त्यांचं एक लाख सैन्य आणि आपले फक्त १५ हजार. त्यांच्यापुढे कसे टिकणार आपण..?'

        'मी येतो ना तुमच्याबरोबर..!' राणाप्रतापचे Maharana Pratap हे उद्गार ऐकले आणि भामाशाहला काहीच कळेचना. कसंबसं तो म्हणाला, ' मी येतो तुमच्याबरोबर ?

         ठाकूरजी,पण त्याने काय होईल ? अहो, ते एक लाख आहेत. तुम्ही आल्याने आपण जास्तीत जास्त पंधरा हजार एक होऊ. !' 

         तसे महाराणा प्रताप Maharana Pratap म्हणाले, ' तसे नाही. मी एक लाख आणि तुम्ही पंधरा हजार. किती झालो ? एक लाख पंधरा हजार ! मग ते तर फक्त एक लाख आहेत. चला...! '

                                                   
maharana pratap


          हि स्वतः ला एक लाख समजण्याची राणा प्रतापकडे जी गोष्ट आहे ना, ती म्हणजेच आत्मविश्वास...! अशी बलाढ्य आत्मविश्वास असणारी माणसंच यशस्वी होतात आणि प्रभावशाली बनत असतात. एवढंच नव्हे, तर ती इतरांमध्येही विश्वास निर्माण करतात . अशक्य ते कार्यही सिद्धीस नेतात. 

            संकट कितीही बलाढ्य असू द्या. त्यावर आपण मात करू शकतो, हा आत्मविश्वासच आपल्याला जय मिळवून देतात. स्वतः च्या सामर्थ्यावर व आपण हे करू शकतो, यावर विश्वास हवा.  जी माणसं दुसऱ्यावर श्रद्धा ठेवतात; ती स्वतः वरचा विश्वास हरवतात. परिणामी, अयशस्वी होतात. 

                                              
Confidence Marathi story


२) आत्मविश्वासाच्या अभावी माणसं कळपातल्या मेंढरासारखी जगत राहतात. 

Confidence Meaning in marathi

          नव निर्माणाची क्षमता हि आत्मविश्वासातून Confidence  येते. आत्मविश्वासाच्या अभावी माणसं कळपातल्या मेंढरासारखी जगत राहतात. जे इतर करतील तेच खरं मानतात. त्यांच्याच मागे-मागे जातात. आपण काही करावं, असं त्यांना मुळी वाटतच नाही. आत्मविश्वासाच्या Confidence  अभावी ते धाडसच त्यांच्यात येत नाही. हि माणसं मग स्वतः ला शुल्लक लेखतात. हीं समजतात. इतरांपुढे कायम माना झुकवून उभी राहतात. लोकांना कदाचित ती नम्र वाटतात. पण ती नम्रता नसते, तर ती कमीपणाची भावना असते. खरी नम्रता हि आत्मविश्वासातूनच Confidence  येते. 

             3) काही माणसं काहीच करत नाही. मात्र नुसती स्वतःच्या बढाया मारत राहतात. खोट्या प्रतिष्ठेचा आव आणतात. त्यापाठीमागे आपल्याला कुणी कमी लेखू नये याचेच खटाटोप जास्त असतात. ते सातत्त्याने इतरांकडे अभिप्राय मागत राहतात. मान्यता घेत राहतात. पाहीशी कुणीतरी उभे राहावे अशी अपेक्षा व्यक्त करतात. सातत्त्याने आधार शोधतात. हि सारी आत्मविश्वासाच्या अभावाची लक्षणं आहे. 

                                               
Columbus History In Marathi Information


4) धाडसी दर्यावर्दी कोलंबस Christopher Columbus information in marathi  

            ठाम निर्णय घेणं, जबादारी पत्करणं,लढण्यास सिद्ध होणं हे सारं आपला आत्मविश्वासाचं साधत असतो. आत्मविश्वास हि न दिसणारी शक्ती आहे. जी तुमच्यातला क्षमत्यांच्या बळावरच तयार होते. कितीही संकट आली, तरी जोपर्यंत तुमचा उद्देश सफल होत नाही, तोपर्यंत ती शक्ती तुम्हाला पुढे-पुढे नेत राहते. सारे बिकट परिस्तिथीपुढे हतबल होत, माघारी फिरू,असं सांगत असतानाही धाडसी दर्यावर्दी कोलंबस Christopher Columbus निव्वळ स्वतः च्या आत्मविश्वासाच्या बळावरच पुढे-पुढे जात राहिला. त्यातूनच त्याने वैभवी प्रांताचा शोध लावला. 

                                            
ए.आर. रेहमान Marathi Information Story


 5)  आंतरराष्ट्रीय कीर्तीचा जगदविख्यात संगीतकार ए.आर. रेहमान A. R. Rahman

A R Rahman Biogrphy in marathi

            माणूस समोर ध्येय ठेवतात खरी, पण त्याला आत्मविश्वासाची जोड नसेल, तर ते ध्येय फक्त ध्येय म्हणूनच राहतं; ते गाठता कधीच येत नाही. मी हे करणारच अशा अशा सकारात्मकतेने पडत-धडपडत अनुभवांनी शिकत -शिकतच आत्मविश्वास प्रबळ होत जातो.लहानपणी अत्यंत लाजाळू असणारा 'ए.आर. रेहमान' A R Rahman कुणापुढं गायचाच नाही. हळूहळू तो अंधारात गाऊ लागला. मग विश्वासाने प्रकाशात आला. बघता-बघता आत्मविश्वासाच्या जोरावर जगासमोर प्रकट झाला. A R Rahman आंतरराष्ट्रीय कीर्तीचा जगदविख्यात संगीतकार म्हणून ख्याती पावला. 

             खरं तर, तुम्ही श्रेष्ठ असतातच. तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला रचनात्मक दर्जा देत तुमचं श्रेष्ठत्व जगासमोर आणत असतो. तोच सांगत राहतो, यश मिळवणं खरंच सोपं आहे, पण तुम्ही आत्मविश्वास मिळवला तरच....!!!

                                          
Nitin Banugade Patil

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने