कठीण परिस्थिती हीच सर्वोत्तम प्रतिभेचे निर्मितिस्थान असते...! Nitin Bangude Patil Latest
byProf. Nitin Banugade Patil•
2
यशाचा पासवर्ड - भाग 13
परिस्थिती
कठीण परिस्थिती हीच सर्वोत्तम प्रतिभेचे निर्मितिस्थान असते...!
यशाची कारणे फारशी शोधली जात नाहीत. कारण यशाला अनेक बाप असतात.अपयशाचे खापर मात्र परिस्थीवर फोडलं जातं. काही करता आलं नाही कि,'आमची परिस्थिती नव्हती हो' किंवा ' परिस्थितीच इतकी भयानक होती कि' असे उद्गार ऐकू येतात. अपयशी माणसं कायम स्वतः ला परिस्थितीचे बळी मानतात. वास्तविक, परिस्थिती हि माणसाच्याच कृत्याची परिणती असते.
परिस्थिती चांगली किंवा वाईट, ती बाहेरून कुणी घडवीत नाही. ती आपली मनोवस्थाच ठरवत असते. ज्या नजरेने तुम्ही तिच्याकडे पाहता, तशी ती तुम्हाला भासत राहते. पण मानसं परिस्थितीला दोष देत हातावर हात ठेवून शांत बसून राहतात. परिस्थिती अनुकूल होईल तेव्हा मी निघेन, असं म्हणणारी माणसं आयुष्यात कधीच जागा सोडू शकत नाही. खरं तर, जी माणसं काही करण्याच्या विचार करतात, ती परिस्थितीचा कधी विचारच करत नाहीत. त्यांना पुरतं ठाऊक असतं कि, परिस्थिती स्वतः हुन बदलत नाही. मी बदलवेन तशीच परिस्थिती बदलणार आहे. परिस्थिती माणसाला घडवतही नाही. आणि बिघडवतही नाही माणूसच परिस्थिती घडवितो आणि बिघडवितो. परिस्थिती माणसाची नव्हे; माणूसच परिस्थितीचा शिल्पकार असतो.
थॉमस एडिसन बहिरे होते. बहिरेपणाच्या दोषामुळे त्यांना शाळेत प्रवेश नाकारला. तेव्हा त्यांच्या आईने त्याना घरीच शिक्षण दिलं. परिस्थीवर रडण्यापेक्षा एडिसन परिस्थितीशी लढत राहिले. आपल्या शाररिक अपंगत्वावर मात करीत अनेक शोध लावून त्यांनी जगाचं अपंगत्व दूर केलं. माणसं पायात चांगली चप्पल नाही, म्हणून रडत बसतात, तर दुसरीकडे पायच नसलेली माणसं नाउमेद न होता परिस्थितीशी झगडत राहतात. परीस्थीने नाकारला तरीही माणसं हार मानून माघार घेत नाहीत. परिस्थितीला आपल्यावर स्वार होऊ न देता ते परिस्थितीवर स्वार होतात. उडता येत नसेल तर पळायला लागतात, पळता येत नसलं तर चालायला लागतात, चालता येत नसेल तर अक्षरश: रांगत-रांगत जातात; पण धडपड करतात. पडतात. पुन्हा उठतात. सातत्याने कृतिशील राहतात. परिस्थीवर विजय मिळवतात. यशस्वीच होतात....!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बौद्धिक क्षमता अफाट होती. अनेकांना ती असामान्य वाटली. एकदा वाचलेलं पुस्तक ते कधीच विसरत नसत. अगदी १० वर्षांपूर्वी वाचलेल्या पुस्तकातील कोणताही संदर्भ विचारला, तरी ते अचूक सांगायचे. त्यांचं इतरांना विलक्षण नवल वाटायचं. पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार, हि क्षमता त्यांनी प्रयत्नपुर्वक विकसीत केली. लहानपणी त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडिलांची पुस्तकं विकत घेऊन देण्याइतकी आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळे एखादं पुस्तक हातात पडलं कि,त्यांना वाटायचं,कदाचित हे पुस्तक पुन्हा आपल्याला मिळणार नाही. आपण विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे हातात पडलेलं पुस्तक असे वाचायचं कि, आयुष्यभर पुन्हा ते पुस्तक हातात घेण्याची गरजच पडणार नाही. इतकी अफाट क्षमता त्यांनी स्वतः त निर्माण केली कि, त्या पुस्तकातील पानन पान,विचारन विचार,वाक्यन वाक्य ते स्मृतीपटलावर कोरूनच ठेवायचे. कधीही विचारा जणू ते मुखोदगतच असावं, असं ते सांगायचे.
पुस्तक घेण्याची परिस्थिती नसलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिस्थीवर मात करत चालते-बोलते ज्ञानपीठ झाले.
खरंतर कठीण परिस्थिती हीच सर्वोत्तम प्रतिभेचं निर्मिती स्थान असते. परिस्थिती हीच स्वतः ला घडवण्याच्या अगणित संधीचं माहेरघर बनतं. एक वेळ चांगली परिस्थिती कदाचीत तुमच्या उपजत क्षमतांचा वापर करून घेणार नाही, मात्र बिकट परिस्थिती तुमच्यातील सर्वोत्तम गुणवत्ता बाहेर काढते. लक्षात असू द्या...घडायचं असेल, तर लढावंच लागेल !
प्रा.नितीन बानुगडे पाटील
(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)
All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com
सदर
लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात
परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून
पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर
कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध
पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
छान अत्यंत प्रेरणादायी
उत्तर द्याहटवाखुप छान प्रेरणादायी ..जीवन उपयोग उल्लेखनीय आहे.
हटवा