insult motivation | अपमानच सन्मान मिळवण्याची प्रेरणा देतो ! Yashacha Password By Nitin Banugade Patil

यशाचा पासवर्ड : अपमान (Insult)

अपमानच सन्मान मिळवण्याची प्रेरणा देतो ! 

Cover Topics :
1) एखाद्या मुलीचा 'नकार' हा आपला अपमान आहे का ?

2) काही नकारात्मक घटना घडल्यानंतर, दुसऱ्याला संपवायलाच नव्हे; तर स्वतःला संपवण्यासाठीही प्रचंड 'धाडस' लागतं. हे ठाऊक असणारी माणसं..., हे असं करायला हे लोक धजावतात कसे...? 
 एवढं 'धाडस' त्यांच्यात येतं कुठून..?

3) अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला आणि या अपमानातून भारताने परमसंगणक बनवला.

                                 माणसांना मान-सन्मान हवा असतो. चोहोकडून लाभावासा वाटतो. पण अवचित कधीतरी-कुठेतरी-कुणाकडून तरी 'चुकून' अथवा 'जाणीवपूर्वक' अपमान insult  केला जातो. त्या अपमानाचा घाव खूप जिव्हारी लागतो. माणसं व्यथीत होतात. कधी पुरती खचून जातात. काही कमालीची संवेदनशील माणसं तर अशा अपमानाने अंतर्बाह्य घुसळून निघतात. पराकोटीच्या निराशेने स्वतः चंच जीवन संपवून टाकतात अथवा ज्यांच्या हातून आपला अपमान घडला आहे. त्याला तरी कायमचं संपवतात. 

अपमान insult  एवढी विलक्षण उलथापालथ करू शकतो, हेही वास्तव आहे. एखाद्या मुलीचा 'नकार' हा आपला अपमान समजून प्रेमातील त्या 'मान' भंगाने स्वतःचा आयुष्य उध्वस्त करणारी किंवा ज्या चेहऱ्यावर भाळला त्याच चेहऱयाला जाळून विद्रुप... विषण्णा करणारी उदाहरणं आजूबाजूला रोज घडतांना दिसतात.अशा ...      

                                                         

insult motivation |  अपमानच सन्मान मिळवण्याची प्रेरणा देतो ! Yashacha Password By Nitin Banugade Patil

                      

2) काही नकारात्मक घटना घडल्यानंतर, दुसऱ्याला संपवायलाच नव्हे; तर स्वतःला संपवण्यासाठीही प्रचंड 'धाडस' लागतं. हे ठाऊक असणारी माणसं..., हे असं करायला हे लोक धजावतात कसे...? एवढं 'धाडस' त्यांच्यात येतं कुठून..? असे प्रश्न उपस्थीत करतात. वास्तविक परीणाम वा सुप्तावस्थेत...! मात्र अशा अपमानातूनच ते बेभान उफाळतं...!

उद्विग्न मनोवस्थेमुळे उफाळत्या धाडसाचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी होतो अन अघटीत घडतं. समाजस्वास्थ बिघडतं. कारण मारणाऱ्याच्या उरातला सूडाग्नी आणि आत्महत्येपायी स्वतःच स्वतःला दिलेला भडाग्नी. या दोन्ही अग्नीचा वापर जर योग्य ऊर्जेत रुपांतरीत झाला असता, तर त्यावर कर्तृत्वाचा इंजिन विलक्षण वेगाने विकासकार्याच्या दिशेनं धावलं असतं. 
                                      

Online Job Stress Marathi


 मात्र यासाठी माणसांची मनं विवेकी आणि विचारी व्हायला हवीत, पण ती विकारी आणि विषारी होताहेत. दुर्दैवाने आमच्याकडे भावनांचं योग्य नियमन करण्याचं आणि उरातल्या उर्जेला योग्य दिशा देण्याचं ज्ञान अथवा संस्कार दिला जात नाही, हि शोकांतीका आहे. अशा समाजस्वास्थासाठीही इंटरनेट-फेसबुक internet Facebook लीलया हाताळणाऱ्या या नव्या टेक्नोसॅव्ही पिढीला विज्ञानाच्या नियमांबरोबर भावनाच नियमनही शिकवावंच लागेल. 

आपल्या मित्राच्या लग्नाच्या वरातीतून मोठ्या आनंदाने चाललेल्या महात्मा जोतीराव फुले यांना, 'ए तु आमच्यासोबत कसा चालतोस ? पाठीमागून लांबून चाल... नाहीतर तुझा स्पर्श होईल... आम्हाला बाटवशील...!' अशी अत्यंत अपमानास्पद वाक्य झेलावी लागली. या अपमानातून महात्मा फुले अस्वस्थ झाले. त्यांच्या मणी प्रश्नाचं काहूर माजलं. मी सधन कुटुंबातील असून माझा हा अपमान, मग उपेक्षीत वंचितांना पददलितांना कशी वागणूक मिळत असेल ? जोतीबा या विचारांनी हैराण झाले. उच्च-निचतेची पेरणी करणारा जातीयवाद संपवून समतेचा वारसा पेरला पाहीजे म्हणत कार्यप्रवण झाले. वरातीतील या अपमानाने त्यांना समाजक्रांतीचा आद्य जनक बनवले. 

3) अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला आणि या अपमानातून भारताने परमसंगणक बनवला.

                                   
gandhi quotes Marathi


               रेल्वेच्या डब्यातून जाताना हा 'काळा माणूस' आपल्या गोऱ्या लोकांच्या डब्यात नको, म्हणून ब्यारिस्टर असलेल्या महात्मा गांधींना Mahatma Gandhi गोऱ्या इंग्रजाने आणि तो जोपासणाऱ्या इंग्रजांच्या विरोधात लढा उभारला. 
             अमेरिकेने भारताला महासंगणक Super Computer देण्यास नकार दिला आणि या अपमानातून भारताने परमसंगणक बनवला.

             पेट्रोल पंपावर Petrol Pump काम करणाऱ्या एका पोराला पेट्रोलपंप मालकाने अपमानीत करून हाकललं. त्यातून ते पोर उफाळलं... कडाडले, 'आता परत येईन तो या देशातल्या टाटा-बिर्ला सारखा मोठा उद्योगपती म्हणूनच !

            आणि काही वर्षातच ते पोर पेट्रोल पंप मालकाच्या पुढे जाऊन उभं राहिलं. म्हणालं, 'ओळखतलं का ? मी तुमच्या पेट्रोल पंपावर कामावर होतो. तुम्ही मला हाकललं होतत मी तोच... तोच मी धीरूभाई अंबानी Dhirubhai Ambani ! रिलायन्स उद्योग reliance industries समूहाचा मालक !!'

                          dhirubhai ambani Maharashtra

जगाच्या इतिहासात, मोठी माणसंही अपमानातूनच उसळी मारून विलक्षण ताकदीने कृतिप्रवण झाल्याची,अपमानातूनच त्यांना जगण्याची ध्येय गवसल्याची उदाहरणं वाचायला- पाहायला मिळतात. मग आपण एखाद्या अपमानाने खचून का जावं ? उलट, जिद्दीने कामाला लागावं. अशा ठिकाणी उभं राहावं, जिथून कुणी हलवणार नाही अशा ठिकाणी बसावं,जिथून कुणी उठवणार नाही. अशा उंचीवर पोहचावं, जिथं कुणी पोहोचणार नाही..!!

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

Nitin Bangude Patil

 

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : Nitinbanugadepatil.com

All this Content Copyrights Reserved | Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 टिप्पण्या

  1. राम राम सर...
    देव माणूस आहात तुम्ही सर....
    तुमच्या सारखा कोणीच नाही....

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने