मन ki baat hosted by Nitin Banugade Patil Yashacha Password | Mind power


यशाचा पासवर्ड : मनशक्ती 

जो मन जिंकतो...तोच रण जिंकतो

Cover Topics : 
1) तुम्ही मनाने दुर्बल आहात का ?
2) जय-पराजय या गोष्टी फार नंतरच्या , पण पहिल्यांदा रणात तर उतरा !
3) मनोबलाअभावी हत्तीचं बळ असणारी माणसंही खचतात आणि 
    मुंगीबळाची माणसंही मनोबळाच्या जोरावर बलाढ्यावर बाजी मारून जातात.


1) तुम्ही मनाने दुर्बल आहात का ?                   

       माणसं शरीरबळ Bodybuilding वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात.मात्र 'मन' बळ Mind Power    वाढविण्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करतात. उत्तम मनोबल हे कर्तृत्वप्रांती यशस्वी होण्याचा सर्वोत्तम गमक आहे. 

                                            
maharashtra bodybuilder


काही माणसं प्रवासाआधी संकटाच्या भीतीने रेंगाळतात. काही थोडं पुढे गेल्यावर अडखळतात. काही एखाद्या अडखळण्यानेही माघे फिरतात तर काही नकोच या वाटेने जायला...! म्हणून सुरुवात करणंच टाळतात. 

या साऱ्या गोष्टी मनाच्या दुर्बलतेमुळे घडतात. 


2) जय-पराजय या गोष्टी फार नंतरच्या , पण पहिल्यांदा रणात तर उतरा !

एका वर्तमानपत्रात एक जाहिरात आली, उत्तम ड्रायव्हर Driver हवा आहे. ज्याने एकदाही अपघात केला नाही ! मुलाखतीला अनेकजण आले.पण प्रत्येकाकडून कुठेतरी, कधीतरी छोटासा का होईन, पण अपघात झाला होताच. पण एकजण सापडला जो छाती ठोकून सांगत होता, गेल्या २५ वर्षात माझ्या हातून एकही अपघात झाला नाही ! 

                            


त्यांचं म्हणणं अगदी खरं होतं. कागदपत्र... पुरावे त्याच्या विनाअपघाताची साक्ष देत होते. पण मुलाखत कर्त्याला राहवलं नाही. त्याने विचारलं, ' गेल्या २५ वर्षात तुमच्याहातून एकही अपघात झाला नाही, या यशाचं रहस्य काय ?' समोरचा शांतपणे उत्तरला, 'गेल्या २५ वर्षात माझी गाडी मी ग्यारेजच्या बाहेर काढली नाही !' खरं आहे, ज्याचा गाड्या ग्यारेजला असतात, त्यांचा अपघात होण्याचा प्रश्नच येत नाही. पण त्यपेखा हेही तितकंच खरं की, त्या गाड्या रस्त्यावर आल्या नाही म्हणजेच त्यांना कधी ध्येय गाठता येणार नाही. जे रस्त्यावर येतील, प्रवासाला सुरुवात करतील, तेच तर ध्येयापर्यंत पोहचू शकतील. 

जय-पराजय या गोष्टी फार नंतरच्या ! पण पहिल्यांदा रणात तर उतरा ! रणात उत्तरणाऱ्यांना किमान विजयाची संधी तरी असते. पण न उत्तरणाऱ्यांच्या माथी मात्र पराजय ठरलेलाच ! महत्वाचा विजय वा पराजय नाही ! महत्वाचं असतं ते लढणं ! लढण्यासाठी सिद्ध होणं ! प्रत्यक्ष लढाईला सुरुवात करणं !

                                   
Chess


पण मनात नकारात्मक विचाराचे वारे फेर धरून नाचू लागतात आणि माणसाची मन डळमळतात. अशी माणसं पराभवाच्या भीतीने वा जे आहे त्याचाही क्षय होईल, या अतिभयाने पुरती गळाठतात. सरळ जागेवर थांबणंच पसंत करतात. हे थांबणं म्हणजे संपून जाणं ! मग संपूणच जायचं आहे, तर गंजून का वाया जायचं ? त्यापेक्षा काही करत झिजून जाऊ या ना...!

3) मनोबलाअभावी हत्तीचं बळ असणारी माणसंही खचतात आणि मुंगीबळाची माणसंही मनोबळाच्या जोरावर बलाढ्यावर बाजी मारून जातात.

        महाभारतमधील Mahabharat वर्णनानुसार, एन कुरुक्षेत्रावर Kurukshetra विमनस्कता प्राप्त झाल्याने युद्धाच्या आरंभीच अर्जुन Arjun खचला. तो लढण्यास सुरुवातच करेना. शरीरातले त्राण गेल्यासारखा तो हतबल झाला. तेव्हा कृष्णाने Srikrishna त्याच्या शरीरावर नव्हे, मनावर संस्कार केला. कृष्णाने अर्जुनाला तिथे जीवन तत्वज्ञान समजावणारी भगवदगीता सांगितली. त्यातून त्याचं मन सिद्ध केलं आणि मग अर्जुन लढाईला सज्ज झाला. 
                                          

mahabharat arjun


समाजातील दुर्योधन Duryodhan प्रवृत्ती संपवण्यासाठी अशी अर्जुनमनं उभी करावीच लागतील. काही करती... धडपडती... लढती मनं घडवणं, ही समाज आणि राष्ट्र घडवन्यातील महत्वाची गरज आहे. मनं तयार करणं, हे राष्ट्र तयार करणंच आहे. कारण कुठलीही गोष्ट एकदा नाही, तर दोनदा तयार होते. मी लिहितोय तो पेन एकदा नाही, तर दोनदा तयार झालाय. पहिल्यांदा बनवणाऱ्याच्या मनात आणि नंतर प्रत्यक्षात !

देशाला महासत्ता बनवायचं आहे ना, मग देश पहिल्यांदा मनात महासत्ता व्हावा लागेल. तर तो प्रत्यक्षात येईल ! शिवरायांनी Shivaji Maharaj स्वराज्य पहिल्यांदा मावळ्यांच्या मनात उभं केलं आणि मनातलं हे स्वराज्य Swarajya मावळ्यांनी प्रत्यक्षात आणलं. 

मनोबलाअभावी हत्तीचं बळ असणारी माणसंही खचतात आणि मुंगीबळाची माणसंही मनोबळाच्या जोरावर बलाढ्यावर बाजी मारून जातात, इतिहास घडवतात. 

म्हणूनच उभ्या आयुष्यात एकदाही लढाई न केलेले वर्धमान ' महावीर ' झाले. कारण त्यांनी 'मन' जिंकलं होतं. आणि जो मन जिंकतो तो रण जिंकतोच ! नुसता वीरच नव्हे तो महावीर ठरतो. 

                                       
Sushant Singh Rajput Marathi


उत्तम शरीरबळ असणारी माणसंही जेव्हा आत्महत्येचा मार्ग पत्करतात, तेव्हा आजच्या सिक्स प्याकच्या जमान्यात मनोबल वाढवण्याचा, मन जिंकण्याच्या महावीरांच्या मार्गाची नितांत आवश्यक वाटते. चला सुरुवात करूया !!  

                                  
Nitin Bangude Patil


प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : www.Nitinbanugadepatil.com

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

 

6 टिप्पण्या

  1. खूप छान ..!अलीकडच्या काळात होत असणाऱ्या आत्महत्या विचार करण्याची गोष्ट आहे,,मग त्या IAS अधिकारी असो,राष्ट्रसंत असो अथवा कोणी फिल्मस्टार असो,या सगळ्यावर प्रभावी भाष्य आणि मनाची मजबूत व्यायामशाळा भरवणारा लेख

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान सर ..तुम्ही अगदी खर सांगितले.. मी पण लीहणार या वरती छोटासा लेख ..तुम्ही मला एक दिशा दाखवली सर..

    उत्तर द्याहटवा
  3. सर तुमच्या भाषनातुन जगण्याची एक प्रकारची ऊर्जा माझ्या मनात तयार झाली आपला आभारी आहे

    उत्तर द्याहटवा
  4. तुमच्या विचारानेच अभ्यासाची गोडी निर्माण होती. छोटे छोटे लिखाण करण्याची आवड निर्माण होते आणि
    तुम्ही माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा आदर्श पैकी एक आहात
    लहान आहे मी त्यामुळे शब्द मांडता येत नाही पण तरिही मनापासून सांगते तुमचा लेख
    म्हणजे एक अद्भुत प्रेरणा🙏🙏🙏 खुप खुप आभार सर इथुनच सांष्ठांग नमस्कार

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने